पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे शोषण नाही; आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीची उच्च न्यायालयाकडून मुक्तता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे हे उत्पीडन होणार नाही. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड संहिता IPC 498 A अनुसार गुन्हा दाखल करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आत्महत्येच्या केस संदर्भात हा निर्णय दिला गेला आहे.

लग्नाच्या नऊ वर्षानंतर सतत पैश्यांच्या मागणीला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. पतीवरती आत्महत्येचा आरोप लावला गेला होता. पैशांसाठी पती रोज पत्नीला मारत होता. याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असेही आरोप हे संबंधित आरोपीवर लावले होते. न्यायमूर्ती पुष्पा गनेदिवाला यांनी या याचिकेवर सुनवायी केली. व आरोपीला शिक्षेतून माफी दिली गेली.

या दाम्पत्याचा विवाह 1995 मध्ये रद्द केला होता. यानंतर 2004 मध्ये पत्नीने आत्महत्या केली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी दर्भा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तक्रारीमध्ये हुंडा मिळाला नाही म्हणून पीडितेच्या सासरचे लोक तिला खूप त्रास देत आणि छळत होते असे आरोप केले गेले आहेत. सत्र न्यायालयाने 2 एप्रिल 2008 मध्ये IPC 306 आत्महत्येसाठी अपहरण आणि IPC 498A कृरत्तेच्या अधीन सासरवाले या अंतर्गत दोषी ठरवले होते. या अरोपंमधून नागपूर खंडपीठाने आरोपींना मुक्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment