सातव्या मजल्यावरून तोल जाऊन बांधकाम मजुराचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील शहानूर मिया दर्गा परिसरातील डी-मार्ट मॉलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अकरा मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडून बांधकाम मिस्तरी चा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. राजू काशिनाथ राठोड, वय-45, (रा. जयभवानीनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

राजू राठोड हे बांधकाम व्यावसायिक बागडिया यांच्याकडे बांधकाम मिस्त्री म्हणून कामाला होते. बागडिया यांचे शहानुर मिया दर्गा परिसरातील डी-मार्ट मॉलच्या पाठीमागे अकरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे राजे राठोड हे बांधकामाच्या ठिकाणी गेले.

सातव्या मजल्यावर काम करीत असताना तोल जाऊन खाली पडून ते बेशुद्ध झाले. हा प्रकार सोबतच्या मजुरांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ या राजू राठोड यांना उपचारासाठी घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment