हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या थंडीचा काळ सुरु झाला असून कडाक्याच्या थंडीत शरीराची काळजी घेणं महत्वाचे आहे. थंडीमुळे सर्दी , पेंडसे असे साथीचे आजार होऊ शकतात. यावर उपाय म्हणून ज्याप्रकारे आपण स्वेटर घालून शरीराचा बाहेरील भागाचे संरक्षण करतो त्याचप्रमाणे असे काही पदार्थाचे सेवन केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळू शकते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. चला जाणून घेऊया असे कोणकोणते पदार्थ आहेत जे आपण रोज खाऊ शकतो .
1) साजूक तूप –
थंडीच्या दिवसात साजूक दुपाचे सेवन करणं फायदेशीर ठरत. तुपात असलेल्या फॅटी ऍसिड मुळे शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत होते . त्यामुळे हिवाळ्यात साजूक तुपात बनवलेले लाडू, शिरा, हलवा, उपमा असे पदार्थ खाणं योग्य ठरु शकतं.
2) मांसाहार-
हिवाळ्यात मांसाहार केल्यास शरीराला चांगल्या प्रकारे उष्णता मिळू शकते. चिकन, मटण, अंडी आणि मासे यांसारखा मांसाहार देखील शरीरास फायदेशीर असतो.
3) आलं –
हिवाळ्यात आलं खाणे उपयुक्त ठरते. आल्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला यासारख्या आजारावर मात करता येते. तसेच खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं.
4) हळद –
थंडीच्या दिवसात हळदीचे सेवन आरोग्याला फायदेशीर ठरते. हळदीमुळे शरीरातील अँटी इंफ्लामेट्री कंपाउंडचा दर वाढतो याशिवाय अँटीबाॅडीजची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारातल्या 50 टक्के अन्नपदार्थांमध्ये हळद असते. दररोज दूधामध्ये हळद घालून प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते.
5) मसालेदार पदार्थ –
थंडीच्या दिवसात हिंग, धने, जिरं, तिरफळ, तेजपत्ता, दालचिनी यांसारख्या मसाल्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. याशिवाय हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, कडधान्ये खावे