”अंगापेक्षा बोंगा मोठा’, कंटेनर चालकाला अतिआत्मविश्वास नडला

0
66
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मणेर मळा ते शिवाजी विद्यापीठाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सरनोबतवाडी येथील उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकून पडल्याने येथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. कमी उंचीच्या पुलाचा अंदाज न आल्याने हा कंटेनर अडकला. हा कंटेनर गोव्याकडे जाण्यासाठी या पुला खालून जाण्याचा प्रयत्न करीत होता. कंटेनर चालकाच्या अति आत्मविश्वासामुळे तो मध्येच अडकला होता. त्यावेळी अंगापेक्षा बोंगा मोठा अशी गत कंटेनर चालकाची झाली.

दरम्यान, नागरिकांनी त्याला कंटेनर परत मागे घेण्याची सूचना केली. परंतु थोडे मागे घेऊन त्याने उजव्या बाजूने पुन्हा कंटेनर पुढे नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु कंटेनरची वरची बाजू पुलाला घासू लागल्यामुळे कंटेनर पुन्हा अडकला. यावेळी काही काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच राजाराम तलावाकडून येणारी जनावरेही ही या पुलाखालून जात असल्यामुळे त्यांची ही गर्दी झाली. शेवटी नागरिकांनी व वाहनधारकांनी कंटेनर चालकास कडक शब्दात समज देत कंटेनर मागे घेण्यास भाग पाडले व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here