कंत्राटदार आता रस्ते बांधणीत गडबड करु शकणार नाहीत! सेन्सर्स करणार गुणवत्तेचे परीक्षण, पहिल्यांदाच वापरले जाणार ‘हे’ नवीन तंत्रज्ञान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भविष्यकाळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत रस्ता बांधकामांच्या दर्जाबाबत काही गडबड होण्याची शक्यता नाही. NHAI गुणवत्तेवर नजर ठेवण्यासाठी पहिल्यांदाच मशीन कंट्रोल टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान लखनौ-कानपूर ग्रीनफिल्ड महामार्गावर वापरण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

तंत्रज्ञान 63 किमी लांबीच्या महामार्गामध्ये वापरले जाईल
रस्ता बांधकाम करताना बर्‍याच वेळा गुणवत्तेविषयी तक्रारी ऐकल्या जातात. तथापि, बांधकाम एजन्सी स्वतः गुणवत्तेवर लक्ष ठेवते. अशा प्रकारच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आता पहिल्यांदाच देशात मशीन कंट्रोल टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. निर्माणाधीन 63 किलोमीटर लांबीच्या लखनौ-कानपूर महामार्गावर हा वापर केला जाणार आहे. टेंडरच्या अटींमध्ये NHAI ने हे नवीन तंत्रज्ञान जोडले आहे. आता तोच कंत्राटदार या प्रकल्पात काम करू शकेल, ज्याच्याकडे हे तंत्रज्ञान असेल. अधिकाऱ्यांच्या मते, सप्टेंबर 2021 पर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू होईल.

मशीन कंट्रोल टेक्नॉलॉजी अशाप्रकारे काम करेल
मशीन कंट्रोल टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता महामार्ग बांधकामाची गुणवत्ता ठरलेल्या मानकांनुसारच होईल. कधीकधी मानकांचे पालन न केल्यामुळे रस्ता लवकरच खराब होतो. हे तंत्र वापरल्याने कोणत्याही तक्रारी येणार नाहीत. या तंत्रज्ञानामध्ये, बांधकामात वापरल्या जाणार्‍या मशीन्स आणि वाहनांवर सेन्सर बसवले जातील. रस्ता बांधकामासाठी ठरविलेले मानक यामध्ये दिले जातील. हे सेन्सर्स NHAI च्या मुख्यालयाशी जोडले जातील. बांधकामादरम्यान, काम निश्चित मानकांनुसार काम केले जाईल तेव्हाच मुख्यालयात मेसेज जाईल. आपण हे अशा प्रकारे समजू शकता की, निर्माणाधीन रस्त्यावर रोलर 10 वेळा चालवावा लागेल. जर कंत्राटदाराने 9 वेळा रोलर रन केला तर मेसेज मुख्यालयात पोहोचणार नाही. म्हणूनच दर्जेदार कामाचे निकष पाळणे आता बंधनकारक असेल.