हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्ष प्रचार सभा घेताना दिसत आहे. याच प्रसार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. सोमवारी शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना,”बकरी राखायचे बंद केले तर लोकांवर कुत्री कापून खायची वेळ येईल” असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. तसेच निवडणुकीच्या काळामध्ये असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने पडळकरांवर कारवाई केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले?
सोमवारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती. या सभेमध्ये बोलताना, “राज्यातील सर्व मेंढपाळांनी मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल” असे पडळकर यांनी म्हणले. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील गोपीचंद पडळकर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर शरद पवार आणि अजित पवार गटावर टीका करतानाही त्यांनी अनेक टोकाची वक्तव्य केली आहे. या वक्तव्यांमुळेच गोपीचंद पडळकर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळात पडळकरांनी वादाला तोंड फुटेल असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळेच त्यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाचे म्हणजे, हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून तिकीट देण्यात आल्यामुळे भावना गवळी (Bhavana Gawali) नाराज झाल्या होत्या. त्यामुळे, मंत्री उदय सामंत यांनी भावना गवळींची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, “आपण नाराज नाही, मात्र तिकीट न मिळाल्याची खंत आहे” अशी भूमिका भावना गवळी यांनी मांडली. तसेच, मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी राजश्री पाटील यांचा प्रचार करणार, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले.