हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा निर्माण झाला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवरच खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये एका वकीलाने ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता बॅनर्जी अडचणी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर विरोधकांनी सभागृहात सरकारी सुरक्षा संदर्भात प्रश्न उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संसदेतून 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण बॅनर्जी यांचा देखील समावेश आहे. परंतु मंगळवारी संसदेच्या बाहेर अनेक खासदार उभे असताना त्याचवेळी कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली. त्यांनी केलेल्या या नक्कल ला खासदारांकडून देखील दाद देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट केला.
या सर्व प्रकरणानंतर जगदीप धनखड यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. यावर त्यांनी, “काही तरी मर्यादा असायला हवी. थोडी तरी लाज बाळगायला हवी होती. एक खासदार माझी नक्कल करतोय आणि दुसरा व्हिडिओ बनवतोय” असे म्हणले होते. त्यानंतर आता थेट कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.