महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या रुग्णास व्हेंटीलेटर लावण्यात आला आहे. त्याच्या प्रकृतीची पूर्णपणे काळजी प्रशासन घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी दिली आहे.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जिंती व महारूगडेवाडी येथील 35 जणांना कृष्णा हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि मित्र परिवाराचा समावेश आहे. या 35 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे. 

Leave a Comment