सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 675 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 943 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 761 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 58 हजार 165 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 31 हजार 863 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3429 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 40 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये आलेल्या बाधितांमुळे जिल्ह्याची काळजी वाढली असताना दिसून येत आहे. कडक लाॅकडाऊन लावून बाधितांचे प्रमाण करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. मात्र तरीही बाधितांचे प्रमाण कमी होत नसताना दिसून येत आहे. मंगळवारी आलेला मृत्यूचा आकडाची चिंताजनक आहे.