मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीराजे घेणार शरद पवारांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण गरम झालं आहे. राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी खासदर संभाजीराजे सकाळी भेट घेतील अशी माहिती आहे.  मागील काही दिवसात सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्तावर येत मोर्चा, आंदोलन करण्याची भाषा काही मराठा संघटना करत आहेत.  त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवर लढली जाणार आहे. या सर्व गोष्टीवर पवार आणि संभाजी राजे यांच्यात आज चर्चा होईल.

दरम्यान यापूर्वीच संभाजी राजे आक्रमक झाले होते. मला कुणी शिकवण्याची गरज नाही . मी छत्रपती घराण्याचा वंशज आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाही. असे संभाजी राजे यांनी म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment