सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत पडत असून गुरुवारी रुग्णांची शंभरी पूर्ण झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बाधित मुलीची 26 वर्षीय आई, नेर्ली (ता. कडेगाव) येथील 57 वर्षीय पुरुष आणि गोरेवाडी (ता. खानापूर) येथील 45 वर्षीय पुरुष असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले.
सध्यास्थितीत 44 रुग्णांवर उपचार असून पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढत चालली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यामध्येच बाधित रुग्ण आढळत आहेत. अखेर सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांनी रुग्णांनी गुरुवारी शंभरी पूर्ण केली. जिल्ह्यात बुधवारी दहा रुग्ण आढळले होते.
मात्र गुरुवारी तीन नवे बाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथील मुंबईहून आलेल्या 45 वर्षे पुरुष पॉझिटिव आढळला. कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथे नवी मुंबईहून आलेला 57 वर्षीय येथील पुरुषही कोरणा बाधित असल्याचे स्पष्ट झाले. नरसिंहगाव (तालुका कवठेमंहाकाळ) येथील कोरोनाबाधित आठ वर्षीय मुलीची आई (वय 26) कोरोना बाधीत झाली आहे.)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.