सांगली महानगरपालिका कोरोना चाईल्ड सेंटर सुरु करणार : आयुक्त कापडणीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेत बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिसरी लाट आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल, असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला.

सांगली महानगरपालिका पालिका क्षेत्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त कार्यालयात मनपाक्षेत्रातील बालरोगतज्ज्ञाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस डॉ शरद घाडगे, डॉ सतीश अष्टेकर, हर्षल वाघ, पंकज कुपवाडे, डॉ जी. ए. श्रीनिवास, डॉ. सुधीर मगदूम, डॉ. उज्वला गवळी, डॉ. वसुधा जोशी, डॉ. सुहास भावे, डॉ. विठ्ठल माळी, डॉ. अमीत तगारे आदी बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली. तसेच या तिसऱ्या लाटेत कशा पद्धतीने बालकांना याचा त्रास होऊ शकतो. यावर काळजी कशी घ्यावी, उपचाराच्या पद्धती कशा असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मनपा क्षेत्रात टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेणेत आला. तसेच कोरोनाबधित बालकांच्या पालकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा आणि परिस्थिती आलीच. तर चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment