जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 254 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसातील रूग्ण वाढ आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली आहे. आज दिवसभरात 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1548 रूग्ण उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 271 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे.
आज आढळून आलेले रुग्णसंख्या तालुकानुसार पुढील प्रमाणे , जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8,पाचोरा 4, अमळनेर 15, चोपडा 23, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, बोदवड 24 , मुक्ताईनगर 21 ह्या प्रमाणे एकूण दिवसभरातील 254 रुग्णसंख्या वाढ आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी #कोरोना वर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 1548 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 254 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली असून आतापर्यंत 271 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. pic.twitter.com/uaGR48AdPB
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 5, 2020