जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 305 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 7275 झाली आहे. आज दिवसभरात 183 रूग्णांनी कोरोना वर मात केली असून आतापर्यंत जिल्ह्यात 4418 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2486 रूग्ण उपचार घेत आहे असून आतापर्यंत 371 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 52, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 28, अमळनेर 4, चोपडा 20, पाचोरा 26, भडगाव 25, धरणगाव 7, जामनेर 48, यावल 3, एरंडोल 4, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, बोदवड 9, मुक्ताईनगर 09, अशी रूग्ण संख्या आहे.
जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आज सात हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येने तीनशेचा आकडा पार केला आहे. गेल्या एका आठवड्यातचं जिल्ह्यात 02 हजार रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोना साखळी अजूनही तुटली नसून नागरिकांनी लॉकडॉऊनचे काटेकोर पणे पालन होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करुन फक्त होम डिलीव्हरी देण्याच्या अटीवर जळगाव शहरातील मार्केटमधील दुकाने दुपारी 12 ते 4 या वेळेत सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 183 रूग्णांनी #कोरोना वर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 4418 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2486 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 305 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 7275 झाली असून आतापर्यंत 371 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला pic.twitter.com/wAHiizvspe
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 17, 2020
#कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करुन फक्त होम डिलीव्हरी देण्याच्या अटीवर #जळगाव शहरातील मार्केटमधील दुकाने दुपारी 12 ते 4 या वेळेत सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री @GulabraojiPatil यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला pic.twitter.com/XhkjHCVV52
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 17, 2020