चिंताजनक! जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा ७० लाख पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, रशिया, स्पेन, यूके इटली, पेरु आदी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे घबराट पसरली आहे. भारतातही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक देशांनी कोरोनाला रोखण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या रुग्णात सतत वाढ होताना दिसत आहेत.

एएफपीच्या वृत्तानुसार, जगभरात कोरोना प्रकरणांची संख्या ७० लाखांपेक्षा जास्त गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर worldometersच्या माहितीनुसार जगात ७१,९३,४७६ रुग्ण आहेत. अमेरिकेत २० लाख २६ हजार ४९३, ब्राझिल ७ लाख १० हजार ८८७, रशिया ४ लाख ७६ हजार, ६५८, स्पेन २ लाख, ८८ हजार ७९७, यूके २ लाख ८७ हजार३९९ आणि भारतात २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. जगात भारताचा क्रमांक सहावा आहे. त्यानंतर इटलीचा आहे. इटलीत २ लाख ३५ हजार २८७ रुग्ण संख्या आहे.

दुसरीकडे, भारतात सोमवारी कोरोनाचे ९ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी, देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. ९ हजाराहून अधिक रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे सतत सहा दिवसी दिसून आले आहे. त्यामुळे भारतात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडलेत. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा विक्रम नोंदवला गेला आहे. ९ हजार ९८३ नवीन रुग्ण सापडलेत. २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे आणखी २०६ मृत्यू तर मृतांची संख्या ७ हजार १३५ वर गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment