Saturday, March 25, 2023

काळजी घ्या..! देशात मागील २४ तासात कोरोना मृतांच्या संख्येने मोडले रेकॉर्ड, तब्बल 2,023 जणांचा मृत्यू

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब मानली जात आहे. मागील 24 तासात देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासात मृतांची संख्या ही 2,023 वर गेली आहे त्यामुळे कोरोनाबाबत आता आणखी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशात मागील 24 तासात दोन लाख 95 हजार 41 नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 इतकी झाली आहे. तसेच मागील 24 तासात देशात १ लाख 67 हजार 457 जण कोरोनावरील उपचारातून तून बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशात एक कोटी बत्तीस लाख 76 हजार 39 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. मृत्यूंची संख्या ही वाढताना दिसत आहे आतापर्यंत देशात एक लाख 82 हजार 553 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तर सध्या देशात 21 लाख 57 हजार 538 जणांवर कोरोना वरील उपचार सुरू आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना वर मात करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क हे घटक जरी आवश्यक असले तरी लसीकरण हे एक महत्त्वाचा घटक मानावा लागेल. देशात लसीकरण मोहीम तीव्र केली जाणार आहे. येत्या १ मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. देशात आतापर्यंत 13 कोटी 1 लाख 19,310 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.