नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. नोराच्या प्रवक्त्यानेही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्याचबरोबर नोरा गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर पडली नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो जुने आहेत. नोरानेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक स्टेटमेंट जारी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “अरे मित्रांनो, दुर्दैवाने मी कोरोना संसर्गाशी लढत आहे… खरे सांगायचे तर मला धक्का बसला आहे.. मी गेल्या काही दिवसांपासून बेडवर पडून आहे आणि आता मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क घाला, ते वेगाने पसरत आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित करू शकते. ”
नोरा फतेहीने पुढे असेही लिहिले की, “दुर्दैवाने मी यावर खूप वाईटरित्या रिएक्ट केले, हे कुणासोबतही होऊ शकते. कृपया काळजी घ्या. मी सावरण्यासाठी काम करत आहे. आपल्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.” यासोबतच तिने आपल्या स्टेट्मेंट्मध्ये हात जोडलेले आणि हृदयाचे इमोजी समाविष्ट केले आहेत.”
नोराला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे
त्याचवेळी नोरा फतेहीच्या प्रवक्त्यानेही एक निवेदन जारी केले आहे. त्याने सांगितले की, नोरा घरातच क्वारंटाइन आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा नोराचा जुना फोटो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नोराचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या पँटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये ती एका कारजवळ उभी राहून कॅमेराकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करताना लोकं म्हणत आहेत की, नोरा आउटिंगवर होती.
नोरा कोविड नियमांचे पालन करत आहे
प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, “प्रोटोकॉलचे पालन करून, नोरा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि सुरक्षा तसेच नियमांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) सहकार्य करत आहे. दरम्यान, कालपासून जो स्पॉटिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो फोटो खूप जुन्या कार्यक्रमादरम्यानचा आहे आणि नोरा अलीकडे कुठेही बाहेर पडलेली नाही. त्यामुळे जुन्या फोटोकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.”