हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांचा समावेश आहे.
के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान के. सी. पाडवी यांच्यासोबत भाजप आमदार आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोण आहेत के. सी. पाडवी-
के. सी. पाडवी हे आदिवासी विकास मंत्री आहेत. के.सी. पाडवी हे जवळपास 1990 पासून अक्कलकुव्याचे आमदार आहेत. काँग्रेस निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सात वेळेस ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.