जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 283 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 12036 झाली आहे. आज दिवसभरात 266 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 8469 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3018 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 549 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 95, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 3, अमळनेर 24, चोपडा 34, पाचोरा 2, भडगाव 3, धरणगाव 4, यावल 13, एरंडोल 22, जामनेर 24, रावेर 6, पारोळा 5, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 14 अशी आहे.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी जळगाव जिल्ह्यात अधिग्रहित करण्यात आलेली तसेच उपचारासाठी परवानगी दिलेल्या 12 खाजगी रुग्णालयातील उपचार बिलाबाबत अडचणी/तक्रार असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 266 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 8469 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 3018 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 283 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 12036 झाली असून आतापर्यंत 549 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला #WarAgainstVirus pic.twitter.com/gxrx24Cd9B
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) August 3, 2020