जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच; आज तब्बल 385 रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 385 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 12766 झाली आहे. आज दिवसभरात 252 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 8945 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 3245 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 576 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ७, धरणगाव ३८, यावल ४, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ३, पारोळा ४, चाळीसगाव १५, बोदवड २  अशी रूग्ण संख्या आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढ होत असून आजही रुग्ण संख्येने त्रिशतक पार केलं आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही जळगाव तालुका व शहर येथे आहे. त्यापाठोपाठ भुसावळ आणि जामनेर येथे आहे.


Leave a Comment