सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात कोरोनाची कहर कमी होताना दिसत नाही. कडक्याची पडणारी थंडी त्यातच साथीच्या रोगांमुळे कोरोना जोरदारपणे बळावत आहे. रविवारी गेल्या चोवीस तासांत नव्याने तब्बल 431 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 143 रुग्णांचा समावेश आहे. अॅक्टीव्ह रुग्णसंख्या अडीच हजाराचा आकडा पार केला.
एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाधित रुग्णापैंकी 130 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी 07, कडेगाव 06, खानापूर 23, पलूस 6, तासगाव 55, जत 17, कवठेमहांकाळ 02, मिरज 39, शिराळा 01 आणि वाळवा तालुक्यात 29 रुग्ण आढळले.राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असताना सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.
महानगरपालिका क्षेत्रासह वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यातील रुग्णांत झपाट्याने वाढ सुरुच असल्याचे रविवारी पुन्हा स्पष्ट झाले. गेल्या चोवीस तासांत कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1277 पैकी 244 बाधित तर 905 अँन्टीजेन चाचणीमध्ये 200 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये 431 जण पॉझिटिव्ह आढळले.