सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 925 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 122 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 925 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 18.6 टक्के आला आहे. कोरोना सोबत अोमिक्राॅनच्या रूग्णात वाढ झालेली असून बुधवारी सातारा जिल्ह्यात तीन रूग्ण वाढलेले आहेत. तर जिल्ह्यात अोमिकाॅन बाधितांची संख्या 13 वर पोहचली आहे.
युवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे : पालकमंत्री
जिल्हयात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस त्वरीत घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.