जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रूग्णसंख्येने गाठला 08 हजारचा टप्पा, आज नव्या 208 रुग्णांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 208 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 8004 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 225 रूग्णांनी  कोरोना वर मात केली असून जिल्ह्यात आतापर्यंत 5051 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2553 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 400 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आज जळगाव शहराने देखील 2 हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 68, जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 10, अमळनेर 34, पाचोरा 8, भडगाव 6, धरणगाव 3, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 23, रावेर 1, पारोळा 28, चाळीसगाव 11, मुक्ताईनगर 1, चोपडा 0 अशी रूग्ण संख्या आहे.

जळगाव जिल्ह्यात काल रोजी एकाच दिवशी 174 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांपर्यंत वाढले असून हे प्रमाण देशाच्या व राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 826 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.


Leave a Comment