जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 574 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 16536 झाली आहे. त्याच प्रमाणे 344 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 4573 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 11325 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 11 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 638 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज 525 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 168, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 22, अमळनेर 89, चोपडा 64, पाचोरा 25, भडगाव 9, धरणगाव 32, यावल 23, एरंडोल 4, जामनेर 31, रावेर 14, पारोळा 39, चाळीसगाव 21, मुक्ताईनगर 3, बोदवड 1 अशी रुग्ण संख्या आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व संशयित रूग्ण शोधण्याकरीता आरोग्य यंत्रणेकडून आज 2912 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 74049 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 344 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 11325 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 4573 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 574 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 16536 झाली. आतापर्यंत 638 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला #WarAgainstVirus pic.twitter.com/lrZN8Saisv
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) August 13, 2020