पुण्यातील भवानी पेठेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे ।  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९ हजारच्या घरात गेली आहे. मात्र जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. हळूहळू जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरातील स्थिती सुधारत आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरातही रुग्णसंख्या आता कमी होत आहे. आतापर्यंत या परिसरात ८६५ रुग्ण आढळले होते. पण आता येथे केवळ १२१ रुग्ण उपचार घेत आहेत. ही माहिती पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे.

“भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय हद्दीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश मिळत असून ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत भवानी पेठ आता दहाव्या क्रमांकावर आहे. आजवर या भागात ८६५ रुग्ण आढळले होते, पैकी केवळ १२१ रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. हे सर्व सामूहिक यश असून राबणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद !” असे ट्विट मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून केले आहे. दरम्यान आता जिल्ह्यात हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ८,९६५ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५,६३७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आणि जिल्ह्यात हळूहळू दैनंदिन व्यवहाराला सुरुवात होते आहे. प्रशासनाच्या वतीने सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Comment