औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसावर आला आहे या आधी हा कालावधी 12 दिवस इतका होता मार्च महिन्यात आत्तापर्यंत चार हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात होती एक फेब्रुवारीला फक्त 18 रुग्ण होते तर ग्रामीण भागात आठ रुग्ण होते त्यामुळे प्रशासनासह महापालिकेचा आरोग्य विभाग देखील निवांत होता पुढील काही दिवसात संसर्ग एवढ्या झपाट्याने पसरला की 10 मार्चला विक्रमी 679 रुग्ण शहरात आठवण आले मार्च महिना सुरू झाल्यापासून सातत्याने रुग्णांचे आकडे वाढत आहेत सहा दिवस 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले त्यानंतर आकडा चारशे पाचशे च्या पुढे गेला आहे.
——————–
रुग्ण दुपट्टीचे प्रमाण चिंताजनक
मार्च महिन्यात आतापर्यंत चार हजार 262 रुग्ण आढळून आले आहेत वाढत्या रुग्ण संख्येमुळे डब्बलींग रेट दहा दिवसापेक्षा खाली आला आहे सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे नागरिकांनी नियम पाळले तर संसर्ग नियंत्रणात येऊ शकते
– नीता पाडळकर, वैधकीय अधिकारी, मनपा
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा