सातारा | सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 981 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 327 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 981 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 18.41 टक्के आला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील एकूण बाधितापैकी 80 टक्के रूग्ण हे गृहविलगीकरण कक्षात आहेत. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांचे प्रमाण अल्प आहे.
गुरूवारी जिल्ह्यात 314 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 2 हजार 212 जण उपचार्थ आहेत.