१० बाय १० च्या खोलीत बसून कोरोनाचा सामना करताहेत पुण्यातील झोपडपट्टीवासी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । ५५०हून अधिक झोपडपट्ट्या असणाऱ्या पुण्यात नागरिकांसाठी सोशल डिस्टन्स अवघड बाब बनली आहे. गल्लीबोळात कॅरम खेळत बसणारी तरुणाई, सोशल डिस्टन्स च्या नावाने उडालेला बोजवारा यामुळे धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांना सार्वजनिक शौचालयस जातानाही दहा वेळा विचार करावा लागतो आहे. नागरिकांच्या मनात शंका कुशंकेने नकारात्मक विचार घर करत आहेत. वृद्धांचे तर या दिवसांत हाल होताना दिसत आहेत. बीपी, शुगर च्या गोळ्या आणायला सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चिंचोळ्या गल्ल्या त्यात पोलिसांच्या सायरनचा आवाज, दाटीवाटीत राहत असल्याने गल्लीतला घोळका हे कायमचच चित्र. भाजीपाला, किराणा आणायला जाताना मोठ्या प्रमाणात बाहेर बसलेल्या पुरुषांमुळे महिला बाहेर अगदी कमीच पडू लागल्या आहेत. शहरातील पूर्व भाग गुलटेकडी, मार्केटयार्ड, आंबेडकरनगर, प्रेमनगर, डायस प्लॉट, कासेवाडी, भवानी पेठ, इंदीरानगर, स्वारगेट या जास्त असणाऱ्या लोकसंख्येचा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा संपूर्ण परिसर झोपडपट्टीबहूल परिसर म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातून चार रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत तर भवानी पेठ क्षेत्रात चाळीसहुन अधिक रुग्ण सापडले असल्याने चिंतेची बाब बनली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment