मुंबई । कोरोनाव्हायरसच्या वाढत्या आकडेवारीमुळे आधीच सरकारसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्व जेल मधील कोरोनाच्या अहवालामुळे ही समस्या वाढली आहे. महाराष्ट्र जेल प्रशासनाच्या कोरोना परिस्थितीच्या अहवालात महाराष्ट्रातील तुरूंगात कोरोनाचा स्फोट झाल्याचेही समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 19 एप्रिलपर्यंत 46 तुरूंगात 197 कैद्यांना कोविड -19 ची लागण झाली आहे. यापैकी 7 कैदी मरणही पावले आहेत. तर 94 हून अधिक तुरूंग कर्मचार्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. यातील 8 तुरूंग कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
येथील अवस्था आहे सर्वात वाईट:
पुण्यातील येरवडा कारागृहात सगळ्यात जास्त 36 कोरोना पॉझिटिव्ह कैदी आहेत. तर 14 तुरूंगातील कर्मचारी संक्रमित झाले आहेत. मुंबईला लागून असलेल्या कल्याण आधारवाडी कारागृहातील 31 कैदी आणि 1 जेल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोल्हापूर कारागृहातही 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मुंबईबद्दल बोलायचे तर, सध्या या तुरूंगात 2 कैदी आणि 4 जेल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ठाणे तुरूंगात 21 कैदी आणि 3 कारागृह कर्मचारी येथे कोरोना ग्रस्थ आहेत, तर तळोजा कारागृहात 3 जेल कर्मचारी कोरोना येथे त्रस्त आहेत.
तुरुंगात दुप्पट क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवलेले असल्याने संक्रमण जास्त:
महाराष्ट्रातील तुरूंगातील ही आकडेवारी भयानक आहे कारण तुरूंगाच्या क्षमतेपेक्षा दोन पट जास्त कैदी तुरूंगात ठेवण्यात आले आहेत. आर्थर रोड कारागृहात 804 कैदी क्षमता असून 2834 कैदी सध्या तेथे कैद आहेत. ठाणे कारागृहात 1,105 कैद्यांची क्षमता असून तेथे 3,758 कैदी बंद आहेत. तळोजा जेलमध्ये 2124 कैद्यांची क्षमता आहे परंतु तेथे 3,353 कैदी बंद आहेत. जर आपण महाराष्ट्रातील 46 तुरूंगांची चर्चा केली तर त्यांची एकूण क्षमता 23217 कैद्यांना कैदेत ठेवण्याची आहे परंतु सध्या या कारागृहात 34422 कैदी बंद आहेत. यातील बहुतेक कैदी असे आहेत की, ज्यांचा वेगवेगळ्या गुन्ह्यात खटला चालू आहे. काहींची शिक्षाही पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत हे समजते की कोरोना विषाणूचा न्यू ट्रेंड जर इथे पसरला तर तो किती भयानक असेल.