कोरोना आकडेवारी स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 881 पाॅझिटीव्ह, आजपर्यंत मृत्यूची संख्या 4 हजारांवर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 881 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 6 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 12 हजार 357 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 78 हजार 278 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 61 हजार 986 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 940 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 28 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

गेले काही दिवसांपासून बाधितांचे प्रमाण कमी झाले असल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास हातभार लागला आहे. परंतु जिल्हा अनलाॅक होण्यास सुरूवात झाल्याने रस्त्यांवर लोक गर्दी करू लागले आहेत. या गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोक बेजाबदारपणे फिरत आहे, तर प्रशासकीय यंत्रणाही सुस्त पडल्याचे दिसत आहे.

You might also like