साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. तरीही त्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर फिरणाऱ्यांच्या चाचणीचा निर्णय प्रशासनाने घेतला. सातारा शहर आणि तालुक्यांत गेल्या दिवसांपासून काेराेना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने तात्काळ विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसावा यासाठी काेराना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका आणि पंचायत समितीने पोलिस आणि आराेग्य विभागाच्या मदतीने ही चाचणी करायची आहे.

यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या आदेशानूसार शहरातील काेणत्याही भागात पथक विनाकारण फिरणा-यांना चाप बसेल अशी आशा आहे.