नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाशी लढण्यासाठी देशात लसींच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. सध्या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीडशिल्ड लस तर भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस या दोन्ही लसीचे उत्पादन केले जात आहे. या दोन्ही स्वदेशी लसी सोडून आता भारतात आणखी एका स्वदेशी लसीचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती आहे.
हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल-ई लिमिटेड’ सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे.
बायोलॉजिकल कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे. सध्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेजमध्ये आहे या आधीच्या दोन पेज मध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहे. बायोलॉजिकल कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही प्रोटिन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे. भारत सरकार कडून स्वदेशी लस निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध कंपन्या संशोधन आणि विकासाच्या कार्याला भारत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. बायोलॉजिकल कंपनीच्या लसीसाठी भारत सरकारकडून क्लिनिकल ट्रायल पासून ते तीनशे अभ्यासा पर्यंत मदत करण्यात आली आहे. या कंपनीला शंभर कोटी रुपयांच्या पासून अधिक आर्थिक मदत करण्यात आली असून इतरही प्रकारची सर्व मदत सरकारकडून करण्यात आली आहे.