वृत्तसंस्था । भारतासह जगातील इतर देशातही कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1.11 कोटींवर पोहोचली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे 5.29 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 63.45 लाख लोकांनी कोरोनामुक्त झाले आहेत.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, चीनच्या वुहान शहरापासून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरात थैमान घालतो आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या 27 लाखावर गेली आहे. तर 1.29 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझील हा प्रभावित देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथे कोरोना रूग्णांची संख्या 1.49 लाखांवर गेली आहे. तर देशातील 61,844 लोकांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन असूनही, अमेरिका, भारत, डेन्मार्क आणि इटलीसह जगभरातील देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली झाल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं मोठी वाढ होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”