जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित 604 रुग्णांची भर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 71% पर्यंत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या 604 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 23527 झाली आहे. त्याच प्रमाणे 617 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 6176 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 16599 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 15 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 752 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2190 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे –  जळगाव शहर 116, जळगाव ग्रामीण 61, भुसावळ 54, अमळनेर 61, चोपडा 63, पाचोरा 43, भडगाव 19, धरणगाव 41, यावल 13, एरंडोल 23, जामनेर 30, रावेर 22, पारोळा 18, चाळीसगाव 20, मुक्ताईनगर 14, बोदवड 02 अशी रुग्ण संख्या आहे.

आजची दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आज दिवसभरात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक मिळाली आहे. कोरोना विषाणू संसर्ग बाबत आतापर्यंत  एक लाख 8 हजारांच्या वर तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 71% पर्यंत तर मृत्यूदर झाला 3.20% पर्यंत कमी झाला आहे. कोरोनाला घाबरू नका पण जागरूक रहा. लक्षणे जाणवताच तपासणी करून घ्या, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.