खबरदारी! पुण्यातील सर्व रेस्तराँ, परमीट रूम, बार, क्लब ३१ मार्चपर्यंत बंदचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लबमधील व्यवहार १८ मार्च ते ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व त्या अंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.

करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.