इच्छाशक्तीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीबाई घरीच झाल्या कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | कुपवाड शहरातील शिवशक्ती नगर मधील 95 वयोवर्ष असलेल्या श्रीमती मुक्ताबाई रामचंद्र कारंडे यांनी कोरोना या भयंकर रोगावर जिद्द व इच्छाशक्तीने गृह विलगीकरणात उपचार घेत यशस्वी मात केली आहे. आजींना धाप लागण्यासारखा त्रास सुरू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने आजीबाई कोरोनामुक्त झालेल्या आहेत.

मुक्ताबाई कारंडे यांच्या नातेवईकांनी आरोग्य विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या सहाय्याने त्वरित द्वारका नगर मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी केली. त्यांचा दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी अंजली धुमाळ व वैद्यकीय अधिकारी मयुर औंधकर यांनी पुढील वैद्यकीय तपासण्या करून उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट होण्यास सांगितले. त्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे उपचारासाठी दवाखान्यात बेड उपलब्ध झाले नाहीत. तसेच या आज्जीना लिव्हरचा त्रास व जास्त वय असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

अशा परिस्थितीत आजींनी कोरोना आजार झाला म्हणून खचून न जाता स्वतःच्या जिद्द आणि इच्छाशक्तीवर कोरोनावर मात करण्याचा निश्चय केला. घरातच गृह अलगिकरणात कोरोनावर आवश्यक तात्काळ उपचार सुरू केले. या आजींची ऑक्सिजन पातळी आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने मयुर औंधकर व अंजली धुमाळ यांच्यासह वैद्यकीय पथकांनी दररोज भेट दिली व आवश्यक उपचार केले. सर्वांच्या प्रयत्नास यश म्हणून दिनांक 4 मे रोजी मुक्ताबाई कारंडे या 95 वर्षाच्या आज्जीनी आपल्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

Leave a Comment