दिलासादायक! महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सर्वाधिक करोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी पार केली आहे. तर चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत एक दिलासादायक गोष्ट आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवार पुण्यात दोन करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं. तर मुंबई आणि औरंगाबाद येथील एका रुग्णाला घरी सोडण्यात आलं आहे.

पुण्यातील डिस्चार्ज दिलेलं हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिलं करोनाचे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. रुग्णालयात १४ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

दरम्यान, या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसेच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांवरही उपचार सुरू आहेत. दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर तिकडे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या १२ करोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत एक आणि ठाणे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

 

Leave a Comment