बापरे!! शरीरात तब्बल ‘इतके’ दिवस राहू शकतो कोरोना ; डॉक्टरांचा खुलासा

corona virus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जगभर कोरोनाचा प्रधुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत असून देशासह संपूर्ण जग चिंतेत आहे. युरोपमध्ये अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करावा लागलाय. भारतामध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांची संख्या ९० लाखांच्यावर गेलीय. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली मध्येही कोरोना रुग्णसंख्येत भर पडत आहे. अशावेळी एक महत्वाची बातमी समोर आलीय. ‘द लांसेट माइक्रोब’ (The Lancet Microbe) मधील रिपोर्टनुसार कोरोना माणसांच्या शरीरात ८३ दिवसांपर्यंत राहतो.

३ महिन्यापर्यंत शरीरात कोरोना 

कोरोना संक्रमण झाल्यानंतर तो शरीरात ९ दिवस राहतो असे आतापर्यंतच्या अभ्यानुसार सांगितले जात होते. विदेशात झालेल्या परीक्षणानुसार कोरोना शरीरात ३ महिने राहतो. ब्रिटन आणि इटलीच्या संशोधकांनी SARS-CoV-2 वर केंद्रीत एकूण ७९ परीक्षणांचे विश्लेषण केले. SARS-CoV-2 हे कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य कारण आहे.

कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीसाठी सुरुवातीचे ५ दिवस महत्वाचे असतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्याला आयसोलेट करणे महत्वाचे असते असे द लांसेट माइक्रोब (The Lancet Microbe) च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’