सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी नव्याने 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये आठ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 196 झाली आहे. एका दिवसात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील 56 वर्षीय महिलेला 25 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्या महिलेचा आठ मे रोजी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. कोरोनामुळे दुसरी मृत पावलेली व्यक्ती ही ७६ वर्षीय असून ते रंगभवन परिसरात रहात होते. 5 मे रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. सात मे रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान आज पहाटे दोन वाजता त्यांचे निधन झाले.
शुक्रवारी नव्याने आढळलेल्या 14 रुग्णांमध्ये गवळी वस्ती जुना कुंभारी रोड येथील एक पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष, हुडको नंबर 3 कुमठा नाका येथील एक पुरुष, समर्थ नगर सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे येथील एक महिला, गीता नगर न्यू पाछा पेठ येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक महिला, कुमठा नाका परिसरातील संजय नगर येथील एक पुरुष, रविवार पेठेतील एक महिला, न्यू पाच्छा पेठ येथील दोन पुरुष व एक महिला, मोदीखाना येथील एक महिला, सदर बझार येथील एक महिला व सिद्धेश्वर पेठेतील एक पुरुष अशा 14 जणांचा समावेश आहे.
केगाव येथील क्वारंटाइन कॅम्पमधून आज एकशे दहा जणांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 170 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 156 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही 209 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”