JEE Main आणि NEET UG परीक्षेवरून ग्रेटा थनबर्गची मोदी सरकारवर टीका, म्हणाली..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने कोरोना संकटात भारतात JEE Main आणि NEET UG परीक्षा घेण्याच्या मोदी सरकाराच्या निर्णयावर टीका केली आहे. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यची सक्ती करणं अन्यायकारक आहे. JEE Main आणि NEET UG परीक्षा  पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते”.

कोरोना संकटामुळे JEE Main आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्रातील मोदी सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेण्यात यावी असा निकाल दिला आहे. याशिवाय JEE Main आणि NEET UG परीक्षा वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ( NTA) सांगण्यात आलं आहे. NTAकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. JEE Main आणि NEET UG परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर JEE Main आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. कोरोना महामारीच्या काळात JEE Main आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारला केली. केंद्र सरकारने धोका कितपत आहे त्याचा आढावा घ्यावा आणि स्थिती पुन्हा योग्य होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती बॅनर्जी यांनी केली आहे. याशिवाय, कोरोना काळात परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment