जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाइलाजान कठोर भूमिका घेत जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूरमध्ये सर्व काही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  बंदची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होणार आहे. करोनाच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवांद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्य सरकारनं शासकीय कर्मचारी ५० टक्क्यांवर आणले होते. हे प्रमाण सरकारनं आणखी कमी केलं आहे. आता २५ टक्के कर्मचाऱ्यांवर शासकीय कार्यालयं चालतील. खाजगी क्षेत्रातही तसं आवाहन केलं आहे. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. पण, काही ठिकाणी अजूनही ऑफिसमध्ये काम होत आहेत. जर हे बंद केलं जात नसेल, तर सरकारला बंद करावं लागेल,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वे आणि बस या शहराच्या रक्तवाहिन्या आहेत. त्या बंद करणं सोपं आहे. पण मग महत्त्वाच्या सेवा पुरवणाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे. त्यामुळं रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. सरकार लढतंच आहे. पण जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकांना घरात राहण्याची विनंती केली आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना मोठं आवाहन केलं. ‘संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका, असं विन्रम आवाहन ठाकरे यांनी केलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Udhhav Thackeray declaired lockdown till 31 March

 

Leave a Comment