राज्य सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोना संकटामुळंं आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीसाठी सरकारी कर्मचारी धावून आले आहेत. मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा, उद्योग ठप्प आहेत. त्याचा थेट परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या अडचणीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी सरकारच्या मदतीला धावून आले आहेत.

सरकारला आर्थिक मदत हवी म्हणून, राज्यातील सर्व कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. संघटनेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देऊन कळवण्यात आले आहे. जवळपास साडेपाच लाख कर्मचाऱ्यांचे अंदाजे ३०० कोटी रुपये या निधीत जमा होणार आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”