हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक काळजी घ्यायची गरज आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक लोक तुम्हाला खूप सारे सल्ले देतील. पण आज तुम्हाला एक कारण सांगणार आहे जे तुम्हला कमी ऐकायला मिळाले असेल. ते कारण म्हणजे जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर पहिला तुम्हला तुमचा टूथब्रश बदलण्याची गरज आहे. हे ऐकून तुम्हला थोडा आश्चर्य वाटेल पण तुम्हला कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट खूप खतरनाक आहे. कारण एकदा व्यक्तीला कोरोना होऊन गेला कि तो पुन्हा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, लसीकरण एक उपाय म्हणून प्रभावी ठरतोय पण कोणत्याही परिस्थिती सुरक्षेची १०० टक्के गॅरेंटी देऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे.
टूथब्रश किती दिवसांनी बदलायचा?
जे रुग्ण अलीकडेच कोरोनातून बरे होऊन घरी आले आहेत त्यांनी लगेच जुना टूथब्रश बदलून नवीन टूथब्रशचा वापर करा. यामुळे त्या व्यक्तीपासून दुसऱ्यांना कोरोना संक्रमित होण्याची शक्यता कमी असते. यामुळे घरातील बाकी सदस्य सुरक्षित राहू शकतात अशी माहिती लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डेंटल सर्जरी विभागाचे एचओडी डॉ. प्रवीण मेहरा यांनी दिली आहे. सर्दी, खोकला आणि तापातून बरे झालेल्यांनी टूथब्रश बदलणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कोविड १९ असेल तर तसेच लक्षणे दिसल्यानंतर २० दिवसानंतर टूथब्रश आणि टंग क्लीनर बदलणे गरजेचे आहे अशी माहिती आकाश हेल्थकेअरचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. भमिका मदान यांनी दिली आहे.
टूथब्रशवर काही काळानंतर बॅक्टरिया निर्माण करते. जर माऊथवॉश उपलब्ध नाही तर गरम पाण्याने गुळण्या करू शकता. तसेच दिवसातून २ वेळा बार ओरल हायजीन ठेवा आणि ब्रश करत जा. कोविड १९ पासून वाचल्यानंतर तोंडाची स्वच्छता, टूथब्रश, जीभेची स्वच्छता याचे महत्व जाणून घेतले पाहिजे. तसेच आपण दुषित ठिकाणी हात लावल्यानंतरसुद्धा कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. ब्राझीलच्या संशोधकांनी कोविड १९ च्या चर्चेवर तोंडाच्या स्वच्छतेचा प्रभाव समजून घेण्यासाठी अभ्यास केला आहे. त्यामध्ये टूथब्रश बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी ओरल हायजीन ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. यामुळे आपण व आपल्या आजूबाजूचे सगळे सुरक्षित राहू शकतात.