हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात करोनाने हैदोस घातला आहेत. अनेक देशांना विनाशाच्या वाटेवर आहेत. करोनाच्या प्रकोपाने युरोपातील स्पेनमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत ९१३ जणांचे मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. यामुळे स्पेनमध्ये करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘एएफपी’ या वृत्त संस्थेने दिली आहे.
स्पेनमध्ये रविवारी ८३८ जणांचे बळी गेले होते. मात्र गेल्या २४ तासांत बळींची आणि रुग्णांची संख्या घटल्याचा दावा प्रशासन करत असतानाच सोमवारी मृतांची संख्या अचानक वाढली. सोमवारी, ७८४६ जणांना करोनाची बाधा असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्पेनमध्ये रुग्णांची संख्या सुमारे ८८ हजार झाली आहे. युरोपमध्ये तीन लाख ९९ हजारहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे.
युरोपध्ये करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. युरोपात इटलीनंतर करोनाचा सर्वात जास्त जीवितहानी स्पेनमध्ये झाली आहे. इटलीमध्ये ११ हजार ५९१ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, स्पेनमधील मृतांची संख्या ७७१६ वर पोहचली आहे. मृतांचा आकडा वाढतंच असल्यानं स्पेनच्या चिंतेत दिवसेंदिवस आणखी भर पडत आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.