नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या येणाऱ्या दिवसात वाढण्याची शक्यता असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सध्या उपचार घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त अधिक नोंदवल्या गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीत ही दिलासादायक बाब समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची लागण झालेल्या १ लाख ३३ हजार ६३२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ कोरोनाचे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.७६ लाखांवर गेली आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग अजूनही कमी झाला आहे. मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे ९९८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान २७९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. भारतात आज सकाळी ९ वाजेपर्यंत कोरोनाची एकूण संख्या २लाख ७६ हजार ५८३ होती. तर कोरोनाने मृ्त्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७४५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांवर गेली असून राज्यात आतापर्यंत कोरोनाने ३२८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”