हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना दिवसेंदिवस फोफावत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. २४ तासात १४९ नवे रुग्ण आढळ्याने ही संख्या वाढली आहे.
तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ती राज्याची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे.
149 new #Coronavirus positive cases have been reported in last 24 hours, total positive cases in India now stand at 873. https://t.co/1XkxnoDWTj
— ANI (@ANI) March 28, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.