औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात 103 नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात 17 रुग्णांची वाढ झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये घाटी रुग्णालयात एक हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. उपचार सोयी-सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. रोटे या गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत होत्या.
दोन दिवसापूर्वी घाटीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून आढावा घेतला होता.