पाकिस्तानातील हिंदू आमदाराला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका हिंदू आमदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की,पाकिस्तानमधील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधील सिंध प्रांतातील विधानसभा सदस्य राणा हमीर सिंग यांची कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली आहे.राणा हमीर सिंग हे वर्ष २०१८ मध्ये थारपारकर जिल्ह्यातून निवडून आले होते. हमीर जिल्ह्याचे मुख्य शहर असलेल्या मिठी येथील वैद्यकीय व्हेंटिलेटर रूमच्या उद्घाटनप्रसंगी राणा यांनी मुत्तहिदा मजलिस-ए-आमल पक्षाचे प्रांतीय आमदार अब्दुल रशीद यांना भेट दिली असल्याचे थारपारकरांचे उपायुक्त डॉ. शहजाद ताहिर यांनी सांगितले. नंतर त्यांनी रशिदला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले.

यानंतर, राणा हमीरसह राशीदच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची नमुना तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले. ते म्हणाले की, सर्व २६ जणांच्या तपासणीत केवळ राणा हमीरचा अहवालच सकारात्मक आला. राणा हमीर सिंग हा अमरकोटचा २६ वा राणा आहे. १९९० च्या दशकात माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात त्यांचे वडील राणाचंद्र सिंह यांनी संघराज्यमंत्री म्हणून काम पाहिले. हमीरचा मुलगा कुंवर करणी सिंहचे २०१५ मध्ये जयपूरच्या कानोटा राजघराण्यात लग्न झाले होते.

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी सांगितले की,सर्व देशभर असलेला कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या १४,८८५ झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment