सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात एकट्या मुंबईत नवे ५९ रुग्ण सापडले आहेत. आता सातार्यात ४ तर कराडात ५ रुग्णांना कोरोना अनुमानित म्हणुन विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात परदेश दौरे करुन आलेले २ प्रवाशी, एक पुरुष वय वर्षे ४९ व एक महिला व वर्षे ६१ तसेच इस्लामपूर येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात निदर्शनास आलेले २ पुरुष वय वर्षे अनुक्रमे २८, ४९ वर्षे हे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे विलगीकरण कक्षात ५ पुरुष अनुक्रमे वय ५४ वर्ष, ५२ वर्ष, ५५ वर्ष, ६६ वर्ष व ६७ वर्ष यांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
मोठी बातमी! मुंबईत एका दिवसात सापडले कोरोनाचे ५९ रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका