‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ विशेषतः आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना याचा लाभ होणार आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारकाला कुठल्याही राज्यातील सरकारमान्य रेशन दुकानावरून आपल्या रेशन कार्डवर रेशन घेता येईल. यासाठी आधार कार्डवर गरजेचं आहे. विशेष करून रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जणाऱ्या मजुरांना या योजनेचा अधिक फायदा होईल. ही योजना मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

यापूर्वी रेशनकार्ड असूनदेखील अनेकांना रेशन मिळत नव्हते. त्याबाबत राष्ट्रीय स्तरावर एकच रेशनकार्ड असावं अशी योजना केंद्र सरकारने तयार केली होती. त्याला आज सरकारने चालना दिली आहे. यानुसार आपल्या रेशन कार्डवरून सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार रेशन घेता येईल. मार्च २०२१ पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही योजना पूर्ण केली जाणार आहे. (इंट्रा-स्टेट पोर्टेबिलिटी ) ही यंत्रणा २० राज्यांमध्ये लागू केली जाईल. या यंत्रणेनुसार इतर राज्यांतील दुकानांवर कामगारांना रेशन घेता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment